महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ मे । पुणे शहर व जिल्ह्यातील २७ शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या तपासणीत आढळून आले आहे. या सर्व शाळांना सरकारी मान्यता नाही. शिवाय यांच्याकडे मान्यता प्रमाणपत्रही नाही. जिल्हा परिषदेने या अनधिकृत शाळांची यादी बुधवारी (ता.२५) जाहीर केली आहे. या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक) संध्या गायकवाड यांनी केले आहे.
या अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे – सुलोचनाबाई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी, बी. बी. एस. इंटरनॅशनल स्कूल, वाघोली, रिव्हर स्टोन इंग्लिश मीडियम स्कूल, पेरणेफाटा, पेरणे, व्ही. टी. एन. ई. लर्निंग स्कूल, भेकराईनगर, किड्स वर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, पापडेवस्ती, फुरसुंगी, संस्कृती पब्लिक स्कूल (माध्यमिक) उत्तमनगर, टन इंग्लिश मीडियम स्कूल, मांगडेवाडी, शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, मांगडेवाडी, आॅर्चिड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव बुद्रूक, संस्कृती नॅशनल स्कूल, लिपानेवस्ती, जांभूळवाडी रोड, संत सावता माळी प्राथमिक विद्यालय, माळीमळा, लोणी काळभोर, पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, अष्टापुरेमळा, लोणी काळभोर, द टायग्रेस स्कूल, कदमवाकवस्ती, ई मॅन्युअल इंग्लिश स्कूल, खांदवेनगर (सर्व ता. हवेली). लिट्ल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवस्ती, सणसर, महात्मा फुले विद्यालय, निमगाव केतकी, गौतमेश्वर प्राथमिक विद्यालय, दत्तनगर, शेळगाव, शंभु महादेव विद्यालय, दगडवाडी, ईरा पब्लिक स्कूल, इंदापूर, विठ्ठलराव शिंदे विद्यालय, इंदापूर (सर्व ता.इंदापूर). जयहिंद पब्लिक स्कूल, भोसे, ता. खेड, सह्याद्री प्राथमिक विद्यालय, मेटलवाडी, डिवाईन विस्डम प्रायमरी स्कूल, वाकसई (दोन्ही ता. मावळ). सरस्वती प्री-प्रायमरी विद्या मंदिर/अल्फा एज्युकेशन हायस्कूल, पिरंगुट, ता. मुळशी. नवीन प्राथमिक शाळा, जेजुरी, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, राख (दोन्ही ता. पुरंदर) आणि आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल, रामलिंग रोड, शिरूर ग्रामीण (ता. शिरूर).