समुद्राच्या 15 फूट खाली पिकवला जाताेय भाजीपाला, उद्यानाचा खर्च 18 कोटी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मे । रोम : इटलीतील नोली येथे भूमध्य समुद्राच्या पृष्ठभागापासून १५ फूट खाली एक अनोखी भाजीपाला बाग तयार करण्यात आली आहे. निमोस गार्डन नावाच्या या अनोख्या बागेचा मालक सर्जिओ गॅम्बेरिनी आहे. येथे भाजीपाला हवाबंद बायोस्फीअरमध्ये पिकवला जातो. या बागेतील सहा अॅक्रेलिक बायोम्स समुद्रसपाटीपासून खाली जमिनीवर साखळदंडाने बांधलेले आहेत आणि २,००० लिटर हवा धारण करतात. या बायोम्समध्ये ९० प्लँट बसवण्यात आले आहेत. समुद्राचे पाणी घनीभूत होऊन या वनस्पतींवर पडते, ज्यामुळे त्यांना पोषण मिळते. या बागेत पिकवलेल्या भाज्यांमध्ये अधिक पोषक तत्त्वे आढळून आली आहेत. या भविष्यकालीन उद्यानासाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *