राज्यातील धरणांमध्ये इतके टक्के जलसाठा, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मे । राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांत बुधवारअखेर ३६.६८ टक्के जलसाठा शिल्लक असून, गतवर्षी याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के होते. टंचाईग्रस्त भागात सध्या ४०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरमध्ये ४६ने वाढ झाली आहे. कोकण विभागात १५५ गावांना, आणि ४९९ वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गुरुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

नाशिक विभागात ११७ गावे, १९९ वाड्यांना १०२, पुणे विभागात ७१ गावे आणि ३६० वाड्यांना ७०, औरंगाबाद विभागात ४३ गावे, २३ वाड्यांना ५९ आणि अमरावती विभागात ६९ गावांना ६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मेअखेरीस देखील टँकरची आवश्यकता भासलेली नाही. राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकार जलसाठ्याचे नियोजन करीत आहे. यासाठी वेळोवळी आढावा घेऊन पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता, अमरावती विभागात एक हजार ९२४ दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या ४७.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात तीन हजार ३२७ दलघमी म्हणजे ४५.१३ टक्के, कोकण विभागात एक हजार ५६७ दलघमी म्हणजे ४४.६५ टक्के, नागपूर विभागात एक हजार ६२० दलघमी म्हणजे ३५.१८ टक्के, नाशिक ‍विभागात दोन हजार १३८ दलघमी म्हणजे ३५ .६२ टक्के, तर पुणे विभागात चार हजार ३८१ दलघमी म्हणजे २८.८ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

विभागनिहाय पाणीसाठा

विभाग पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)

कोकण ४४.४३

मराठवाडा ४४.६१

नागपूर ३५.१४

अमरावती ४६.९३

नाशिक ३४.९९

पुणे २९.१६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *