राज्यात आता सर्व परीक्षा ऑफलाईनच, 12 वी मेरीटबाबतही मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ मे । राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन (Exam Offline) होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी परीक्षांबाबत शुक्रवारी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचं संकट आता निवळलंय. त्यामुळे विद्यापीठाांच्या परीक्षा यापुढे ऑफलाईनच घेण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. कोरोनामध्ये सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झाल्या. शिक्षणही ऑनलाईनच सुरु होतं. दरम्यान, आता शाळा आणि कॉलेज पूर्ण क्षमतेनं सुरु झालेत. त्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. आता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार नसल्यानं विद्यार्थ्यांना (Student Exam) ऑफलाईन परीक्षेला सामोरं जावं लागमार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना वेळ अपुरी पडू नये, यासाठी काही परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परीक्षेआधी प्रश्नपत्रिकाही देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेरीस आता सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन होतील, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

ऑफलाईनच…
वेगवेगळ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन घेऊ नयेत, यासाठी आंदोलन केलं होतं. निदर्शनं देखील करण्यात आली होती. सुरुवातील या विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरत काही प्रमाणात ऑनलाईन सवलही परीक्षांमध्ये देण्यात आलेली. दरम्यान, आता सर्वच गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानं परीक्षादेखील ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

निकाल लवकर लागणार..
बारावीच्या परीक्षेबाबतही उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर लावावेत अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बारावीचे विद्यार्थी हे अनेकदा सीईटी परीक्षेच्या स्पर्धेत बारावीच्या मुख्य अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतात असंही निदर्शनास आलं आहे. याचा विचार करुन पुढच्या वर्षीपासून मेरटीसाठी बारावी आणि सीईटी असे प्रत्येकी पन्नास टकेक गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही असा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मेरीटसाठी हीच पद्धत ग्राह्य धरली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *