1 जूनपासून बदलणार 5 नियम, तुमच्या खिशावर होईल परिणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मे । मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. सध्या तरी महिना बदलला की अनेक नियम बदलतात. येत्या 1 जूनपासून बदलणाऱ्या या नियमांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घेऊया या नियमांबद्दल…

1) गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा-
सोन्यामध्ये गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 1 जून 2022 पासून सुरू होणार आहे. आता 256 जुन्या जिल्ह्यांव्यतिरिक्त 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडण्यात येणार आहेत. आता या सर्व 288 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग बंधनकारक असेल. आता या जिल्ह्यांमध्ये 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेटचेच दागिने विकता येतील. हॉलमार्किंगनंतरच त्यांची विक्री करता येणार आहे.

2) SBI चे गृहकर्ज महागणार-
तुम्ही SBI बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर 1 जूनपासून तुम्हाला हे कर्ज महाग पडू शकते. SBI ने त्यांचा एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंट्सने वाढून 7.05 टक्के केला आहे. तर RLLR 6.65 टक्के प्लस CRP असेल.

3) मोटर विमा प्रीमियम-
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अलीकडील अधिसूचनेनुसार, 1000cc पर्यंतच्या इंजिन क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम 2,094 रुपये असेल. कोविडपूर्वी 2019-20 मध्ये ते 2,072 रुपये होते. त्याच वेळी, 1000cc ते 1500cc कारसाठी विमा प्रीमियम 3,416 रुपये असेल, जो पूर्वी 3221 रुपये होता. म्हणजेच कार विमा महाग होईल.

4) ऍक्सिस बँकेचे बचत खाते नियम बदलतील-

Axis बँकेने 1 जून 2022 पासून बचत खात्यावरील (Savings Account) सेवा शुल्कात (Service Charge) वाढ केली आहे. बॅलेन्स मेन्टेन करण्यासाठी मंथली सर्व्हिस फीसचा समावेश केला आहे. NACH अंतर्गत ऑटो डेबिट अयशस्वी झाल्यास 1 जुलैपासून चार्जेस लागू होतील. अतिरिक्त चेकबुकवरही चार्ज लागेल.

5) सिलिंडरच्या किमती वाढू शकतात-
1 जूनपासून सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *