![]()
महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मे । पुणे शहरासह, उपनगरात दर्जदार फळ व पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे भाव 150 रुपयांपर्यत पोहचले आहेत. पालेभाज्याच्या गड्डीचे भाव 40 ते 30 रुपयांपर्यत पोहचले आहेत.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव
भाज्या दर
हिरवी मिरची 100-120
घेवडा 180-200
वाटाणा 180-200
वॉलवर 120-140
शेवगा 80-100
टोमॅटो 80-100
दोडका 80 -100
वांगी 70-80
पालेभाज्यांचे गड्डीचे भाव
कोथिंबीर 30-40
मुळा 30
मेथी 30
कांदापात 30
अंबाडी 30
चाकवत 30
