वाहनचालकांसाठी बातमी ; ३१ मे रोजी राज्यातील पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मे । राज्यातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या ३१ मे २०२२ रोजी पेट्रोल पंपचालकांनी डिलर कमिशन वाढवून देण्यासाठी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी इंधन खरेदी न करण्याच्या निर्णयाने राज्यातील पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांना त्यापूर्वीच इंधन टाकी फूल करावी लागणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क आणि इतर करांचा वाद सुरु असतानाच आता यामध्ये पंप चालकांनी उडी घेतली आहे. २०१७ पासून कंपन्यांनी डिलर कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. मागील काही वर्षांपासून पंप चालकांनी डिलर कमिशन वाढवण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कंपन्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पेट्रोल डिलर्सने इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे आंदोलन देशभरात होणार आहे. त्यामुळे ३१ मे रोजी पेट्रोल डिलर कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाहीत. परिणामी महामार्गांवर, निमशहरी आणि ग्रामीण भागातील छोट्या पंपावर इंधनाचा साठा संपण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *