Monsoon Rain : उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, कुठे कुठे पावसाची शक्यता?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मे । मान्सूनचं (Monsoon Rain Update) आगमन लांबणीवर पडलं असलं, तरी दिलासादायक अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आलाय. येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलंय. राज्यात हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्टही (Maharashtra Rain Yellow Alert) दिलाय. मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा होऊन पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्यानं वातावरणातही बदल जाणवणार आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 30 मे पासून 1 जून पर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पारा घसरला
गेल्या काही दिवसांत तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. तसंच कोकणातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या आहेत. वातावरणही ढगाळ असल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान, येत्या तीन दिवसांत आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

मान्सून लांबला..
मान्सूनचा पाऊस अंदमानात वेळेत पोहोचला असला तरी केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास उशीर झालाय. त्यामुळे राज्यात मान्सूनचं आगमनही लांबणीवर पडलंय. आता सात जून ते दहा जून या दरम्यान, राज्यात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, येत्या 48 तासांत मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यताय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *