पिंपरी – चिंचवड लॉकडाऊनमध्येही दोन बिअर शॉप सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४-ऑनलाईन -पिंपरी -चिंचवड ; लॉकडाऊनच्या काळात बिअर शॉपी सुरू ठेवण्यात आली. ही घटना पिंपरी भाजी मंडई येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज रामचंद्र सुरेजा (वय 55, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) आणि लखन मोहन रख्यानी (वय 34, रा. रमाबाई नगर, लिंक रोड, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी राजाराम मारूती काकडे (वय 49) यांनी शनिवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी आपसांत संगनमत करून पिंपरी भाजी मंडई येथील निक्‍की बिअर शॉपी हे दुकान सुरू ठेवले. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश असतानाही आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात भा. द. वि. 188, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे याबाबत अधिक तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *