आठवड्याचे राशिभविष्य – रविवार 29 मे शनिवार 4 जून 2022

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ मे ।

मेष – आरोग्याची काळजी घ्या
मंगळ, गुरू युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. प्रसंगावधान ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. वरिष्ठांची मर्जी राखा. व्यवसायात वाद वाढवू नका. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळता येईल. परंतु विरोधक तुमच्यावर आरोप करतील. दौऱ्यात सावध रहा.
शुभ दिनांक :- 1, 2

वृषभ – कामाचा व्याप वाढेल
चंद्र, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो जवळच्या व्यक्तींना न दुखवता बोला. व्यवसायात क्षुल्लक नाराजी होईल. नोकरीत कामाचा व्याप राहील. नवा बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. योजना पूर्ण करण्यात यश मिळेल.
शुभ दिनांक :- 2, 3

मिथुन – उतावळेपणा नको
चंद्र, शुक्र लाभयोग, मंगळ, गुरू युती होत आहे. कोणत्याही विषयावर चर्चा करताना उतावळेपणा नको. नोकरीत वरिष्ठांसमवेत तडजोडीचे धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामातील चुका दाखवल्या जातील. वरिष्ठांच्या मनात गैरसमज निर्माण करून देण्यात येईल. स्पर्धा सोपी नाही.
शुभ दिनांक :- 3, 4

कर्क – उत्साहवर्धक आठवडा
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या मध्यावर जपून बोला. नोकरीत यशस्वीपणे कठीण कामे करून दाखवाल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी करता येईल. जनहिताच्या कार्याकडे लक्ष द्याल. स्पर्धेत प्रगती होईल.
शुभ दिनांक :- 3, 4

सिंह – कामात यश मिळणार
मंगळ, गुरू युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. धंद्यात वाद वाढवू नका. नोकरीत तुमच्या कार्याचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव निर्माण करणारे लोक वाढतील. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई नको. घरगुती प्रश्नात तणाव होईल.
शुभ दिनांक :- 1, 2

कन्या – वादविवाद टाळा
सूर्य, चंद्र लाभयोग, मंगळ, गुरू युती होत आहे. जवळच्या व्यक्तीसमवेत मतभेद होतील. मैत्रीत गैरसमज होईल. धंद्यात जास्त मोह ठेवू नका. नोकरीत प्रभाव टिकवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण समस्येवर उपाय शोधाल. प्रतिष्ठा वाढेल. जवळच्या व्यक्तींकडून मनस्ताप होईल.
शुभ दिनांक :- 1, 2

तूळ – कामावर लक्ष केंद्रित करा
मंगळ, गुरू युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. कठीण प्रसंगांवर मात करावी लागेल. कठोर बोलणे टाळा. कायदा मोडू नका. धंद्यात नम्र रहा. कोणाच्याही विरोधात बोलणे घातक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तत्पर रहा. तडजोडीचे धोरण ठेवा. कामात चूक होणार नाही याकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक :- 1, 2

वृश्चिक – समस्या सुटतील
चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. जवळच्या व्यक्तींकडून मानसिक त्रास होईल. मनावर दडपण येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. किचकट प्रश्न सोडवा. कोणत्याही व्यवहारात अडकणार नाही याकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक :- 3, 4

धनु – कायदा पाळा
चंद्र, मंगळ चंद्रयोग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. कामे रेंगाळतील. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. धंद्यात नम्र रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामावर आक्षेप घेतला जाईल. वरिष्ठ तुमच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करतील. रागावर ताबा ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. कोर्टाच्या कामात कायदा पाळा.
शुभ दिनांक :- 1, 2

मकर – चंगळ बदल होईल
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. विचारपूर्वक आचरण ठेवा. धंद्यात किरकोळ समस्या येतील. नोकरीत चांगला बदल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या आक्रमकपणाने दहशत वाढेल. गोड बोलून तुमची दिशाभूल होईल. स्पर्धेत प्रगती होईल. प्रेरणादायक घटना घडेल.
शुभ दिनांक :- 3, 4

कुंभ – व्यवसायात फायदा
मंगळ, गुरू युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो चर्चा वादाकडे झुकेल. नम्रता व सभ्यता बाळगून परिस्थिती हाताळता येईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचय होतील. कौटुंबिक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा.
शुभ दिनांक :- 1, 2

मीन – आर्थिक व्यवहार जपून करा
मीन राशीला थोडय़ा कालावधीसाठी साडेसाती सुरू आहे. चंद्र, बुध लाभयोग, मंगळ, गुरू युती होत आहे. तुमच्या आत्मविश्वासात भर पाडणारी घटना घडेल. धंद्यात चांगली संधी मिळेल. पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतिकारक वातावरण राहील.
शुभ दिनांक :- 3, 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *