‘स्विच सीएसआर 762’ मॉडेल भारतात दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती करणारी स्विच मोटोकॉर्पने अखेर भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटारसायकल सीएसआर 762 सादर केली आहे. याची एक्स शोरुम किमत 1.65 लाख रुपये आहे. दुचाकीवर साधारणपणे 40 हजार रुपयांची सबसिडी मिळणार असल्याचे समजते.

कंपनी 2022 मध्ये सीएसआर 762 निर्मिती प्रकल्पामध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूकही करणार आहे. सीएसआर 762चे डिझाईन सिंहाप्रमाणे केले आहे. या अगोदर या दुचाकीला जुलै ते ऑगस्ट 2022 दरम्यान सादर करण्याची योजना होती. मात्र ही त्या अगोदरच सादर करण्यात आली आहे.

एका चार्जिंगवर 110 किमीचे अंतर कापणार

स्विच सीएसआर 762 इलेक्ट्रिक दुचाकी दमदार मायलेज देणार आहे. कंपनीने दावा केला आहे, गाडी साधारण 110 किमी पर्यंत पळविल्यास यांचे टॉप स्पीड 120 किमी तास राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले. यासह 10 केडब्लू व 56एनएमचा पीक टॉर्क असून यामध्येच 3.7केडब्लूएच लिथियम आयर्न बॅटरी मिळणार आहे.

कूलिंग सिस्टम मिळणार

सीएसआर762मध्ये तीन स्टँडर्ड रायडिंग मोड आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स, रिव्हर्स आणि पार्किंग मोड आहे. दुचाकीमध्ये एक पॉवरफूल 3 केडब्लू पीएमएस मोटारसोबत 5 इंच टीएफटी कलर डिस्प्ले व एक थर्मोसाइफन कूलिंग सिस्टमसारखे फिचरही मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

देशभरात डिलरशिप सुरु करणार

भारतीय बाजारात आगामी काळात ग्राहकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी देशभरात डिलरशिपचे जाळे निर्माण करण्यावर विचार करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 15 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक दुचाकी डिलरशिप शोरुम सुरु करण्याची शक्यता सांगितली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *