पावसाळ्यात चप्पल खरेदी करतायं; ‘या’ टिप्स फॉलो करा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । पावसाळा सुरु झाला की गडबड सुरु होते ती छत्री, रेनकोट खरेदी करण्याची. त्याचबरोबर पावसाळी हलके फुलके ड्रेस खरेदी करण्यावर भर दिला जातो. या दिवसात ड्रेसवर मॅचिंग चप्पल घालणे शक्य होत नाही. कारण ब्रॅन्डेड शूज खराब होतात. अशावेळी प्रश्न पडतो तो नेमके कोणते चप्पल, शूज खरेदी करावे. मागच्या वर्षी मी हे शूज घेतले होते. यावर्षी काहीतरी नविन खरेदी करुया या विचारात असाल तर काळजी करु नका. आज तुम्हाला आम्ही छोट्या-छोट्या टिप्स देणार आहोत ज्याची तुम्हाला मदत होईल. ज्यात तुम्हाला वेगवेगळे कलरही खरेदी करता येतात.

ट्रान्सपरंट चप्पल्स
ट्रान्सपरंट चप्पल्स तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होते.यामध्ये तुम्हाला भरपूर कलर मिळतील. कोणत्याही ड्रेसवर तुम्ही वापरु शकता.

गम बुट्स
पूर्वी गम बुटाची फॅशन होती. कालांतराने परत याची क्रेझ आली आहे. तुम्हाला बाजारात यात अनेक व्हरायटी मिळू शकतात. तसेच वेगवेगळे रंगही उपलब्ध आहेत. तुम्ही यंदाच्या पावसात हा पर्याय निवडू शकता.

बलेरियन्स
ज्यांना दररोज शूज घालायची सवय आहे. त्यांना पावसाळ्यात बलेरियन्स बेस्ट पर्याय ठरु शकतो. ज्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात शुज घातल्याचा फिल येतो. याशिवाय पाय कोरडे राहण्यापासून मदत होते.

क्रॉक्स
पावसाळ्यात क्रॉक्स हा उत्तम पर्याय आहे. शॉर्टस आणि शर्टवर क्रॉक्स वापरु शकता. फॅशनही होते आणि पावसाच्या पाण्यापासून बचावही होतो.

व्हेजेस
साध्या बाजारात फ्लॉरल प्रिंटेड व्हेजेसचा ट्रेंड आहे. पावसाळ्यात पेन्सिल हिल्स ऐवजी या व्हेजेसचा वापर करता येतो. ज्यांना हिल्स घालण्याची सवय असते त्यांना हा पर्याय उत्तम ठरु शकतो. हे चप्पल तुम्ही आॅफिस आणि बाहेरही वापरु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *