व्हॉटस्ऍपवर मेसेज पाठवल्यानंतरही एडिट करता येणार, लवकरच येणार नवीन फीचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । सध्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात, पण एडिट केले जाऊ शकत नाहीत. मात्र लवकरच व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर येतेय. त्यामध्ये मेसेज पाठवल्यानंतर युजर्स ते एडिट करू शकतील.

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपमध्ये नवनवीन फीचर्स येत आहेत. आता पंपनी व्हॉट्सअॅपमध्ये एडिट बटण हे फीचर आणणार आहे. अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये एडिट बटणाची टेस्टिंग करत आहे. डब्ल्यूएबेटाइन्पह्ने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये असे दिसते की, व्हॉट्सअॅप एक नवीन पर्याय विकसित करत आहे. त्याच्या मदतीमुळे युजर्स मेसेज पाठवल्यानंतरही त्यांची चूक सुधारू शकतील. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. यामध्ये आगामी काळात काही बदलही होऊ शकतात. व्हॉट्सअॅप हे फीचर सर्व अँड्रॉइड बीटा, आयओएस बीटा आणि डेस्कटॉपसाठी काम करत आहे, असे समजतंय. अद्याप फीचरबद्दल यापेक्षा जास्त माहिती मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *