महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । : केरळात मान्सूनला (monsoon update in Kerala) सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्यात ही मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) हजेरी लावली वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाचा पाऊस झाला, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. (weather update) तसेच पुणे, मुंबई या भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याने उष्णतेची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (heat wave vidarbha)
राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. 03) कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान कोल्हापूर आपत्ता व्यवस्थापन विभागाकडूनही काही सूचना करण्यात आल्या आहेत.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली नगर जिल्ह्यातील अकोला येथे 50 मिलिमीटर, श्रीरामपूर येथे 20 मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर मराठवाड्यातील लातूरच्या उदगीर, औसा, परभणीतील घालेगाव, बांड मधील अंबाजोगाई येथे प्रत्येकी 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आज (ता. 3) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये राज्यात पुणे 34.6, नगर 35.1. धुळे 40.5, जळगाव 41.2. कोल्हापूर 34.2. महाबळेश्वर 24.6, नाशिक 36.2. निफाड 36.8, सांगली 35.8, सातारा 33.8, सोलापूर 37.2, सांताक्रूझ 34, डहाणू 34.2, रत्नागिरी 33.2, औरंगाबाद 39, परभणी 40.7, नांदेड 40.8, अकोला 43.7. अमरावती 40.2. बुलडाणा 39.5, ब्रह्मपुरी 45.2, चंद्रपूर 44.8, गोंदिया 44.8 नागपूर 43.8, वर्धा 44 तापमानाची नोंद झाली.