महाराष्ट्र 24 : ऑनलाईन: 04 जून: शुक्रवारी 84 दिवसांनंतर 24 तासांत देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची 4 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच त्याचा शोध आणि दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Coronavirus Update In India)
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तमिळनाडूसह (Kerala, Karnataka, Maharashtra, Telangana and Tamil Nadu) पाच राज्यांच्या अधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाबाबत पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे आणि संसर्ग झालेल्या लोकांच्या गटावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि पुरेशा संख्येत कोरोना संसर्गाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.