महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । तळेगाव दाभाडे । तळेगाव दाभाडे येथील वृक्ष विनापरवाना तोडल्याची तक्रार नागरीकांनी केली. त्यानुसार संबंधितांकडून १ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली. तळेगाव दाभाडे – मुंबई पुणे महामार्गावर मालकी गट क्रमांक ४०८ आवारामधील एकूण ३ राखीव प्रजातींचे वृक्ष मंगेश दाभाडे व संतोष खांडगे यांनीच तोडल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनीविनापरवाना वृक्षतोडलेल्याचे मान्य केले व तसा लेखी स्वरूपात जबाब नोंदविला आहे. अशी माहिती बाळासाहेब दाभाडे यांनी दिली .