Yellow Alert : राज्यात “या” जिल्ह्याला आजपासून चार दिवस यलो अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । हवामान विभागाकडून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. 6 ते 9 जूनपर्यंत 13 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मान्सुन सरींसाठी परिस्थिती सध्या अनुकूल नाही. 6 ते 9 जून या कालावधीमध्ये हवेचा दाब काही भागांमध्ये किंचित कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सून रेंगाळल्याने राज्यात उष्णतेची लाट
सर्वसाधारणपणे अंदमानमध्ये मान्सून (Mansoon) 22 मे दरम्यान येतो. मात्र, यावर्षी त्याला अपवाद ठरल्याने मान्सून 16 मे रोजी दाखल झाला. त्यानंतर केरळमध्येही चार दिवस अगोदर दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण होते, पण अरबी समुद्रात आल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आहे.

महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा
दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या चटक्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं 29 मे रोजी केरळात प्रवेश केला. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकमध्य पोहोचला. गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये (Kerala)पोहोचेल, असं भाकीत हवामान विभागानं केलं होतं, पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळं नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *