‘हा’ खेळाडू मोडू शकतो सचिनचा विक्रम ? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली भविष्यवाणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. हा सामना यजमान इंग्लंडने जिंकला. माजी कर्णधार जो रूटने नाबाद ११५ धावांची खेळी करून विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. या शतकी खेळीच्या जोरावर जो रूटने कसोटी क्रिकेटध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला. रूटने न्यूझीलंड विरुद्ध झळकावलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक होते. त्यामुळे रूट आता विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या सर्वाधिक कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. कोहली आणि स्मिथ दोघांच्याही नावे २७ कसोटी शतकांची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने जो रूटबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

सध्या जगाच्या कानाकोपऱ्यातून जो रूटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने तर रूटची तुलना सचिन तेंडुलकरशी केली आहे. टेलरच्या मते, कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रम जो रूट सहज मोडू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने वैयक्तिक १५ हजार ९२१ धावांचा विक्रम रचलेला आहे. आजपर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *