Salman Khan: धमकीच्या पत्रानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ; मुंबई पोलिसांकडून विशेष टीम तैनात

 121 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । पंजाबी गायक ‘सिद्धू मूसेवाला’ याच्या हत्येनंतर (Sidhu Moosewala Murder) बॉलिवूड अभिनेता ‘सलमान खान’ला जीवे मारण्याची धमकी (Salman Khan threat letter) आल्यानं सलमान खानच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police Special Team) विशेष टीम तयार केली आहे. दोन ज्याईंट सीपी क्राईम आणि कायदा सुव्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली ही टिम तैनात करण्यात आली असून मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी सलमानशी संपर्क साधून त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय. रविवारी 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची ( Mumbai Crime Branch) एक टिम तात्काळ दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राइम ब्राँचच्या टिमला सहकार्य करताना दिसला.

GB LB नावानं सलमान खानला धमकीचं पत्र आलं होतं. गोल्डी बरार आणि लॅारेन्स बिश्नोई यांचा यामागे हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. ‘सलीम खान सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा GB LB’, असा धमकीचा मजकूर असलेलं पत्र सलमानच्या बॉडीगार्डला मिळालं होतं. याआधी देखील अशाच स्वरुपाचे धमकीचे पत्र सलमान खानला मिळालं होतं. सलमान खान धमकी प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

5 जून रोजी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सलमान खान दररोज वॉक जातो. तो ज्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबतो त्या ठिकाणी बॉडीगार्डला धमकीचं पत्र सापडलं. सलमान खान आणि वडीलांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांनी तात्काळ वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *