महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ जून । विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (MLC Election 2022) भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर (BJP release names of candidates for Vidhan Parishad election) केली आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचा समावेश नाहीये आणि पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही विधानपरिषदेवर संधी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत उमा खापरे यांच्या नावाचा समावेश करुन सर्वांनाच भाजपने एक झटका दिला आहे.
भाजपने ज्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांच्या नावांचा समावेश आहे.