Rajya Sabha Election: फडणवीसांचा महाविकासआघाडीला सुरुंग ;असा झाला Number गेम…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ जून । राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेवर भाजप उमेदवार धनंजय महाडिक (BJP candidate Dhananjay Mahadik) यांनी विजय मिळवला आहे. धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे.

महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालात मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपने महाविकास आघाडीची काही मते फोडण्यात यश मिळवलं आहे. असा झाला नंबर गेम…

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मतं

संजय राऊत- 41

प्रफुल्ल पटेल- 43 -2

ईम्रान प्रतापगडी- 44 – 3

संजय पवार- 33

भाजपच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीचे मतं

अनिल बोंडे- 48

पियुष गोयल- 48

धनंजय महाडिक 27

मतांचे समीकरण

संजय पवार यांना मिळालेली मतं

33+2 = 34

संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली.

धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं.

27+7+7 = 41

धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे.

भाजपने महाविकास आघाडी समर्थक 6 अपक्ष आमदारांना फोडले आणि त्यांची पहिल्या पसंतीची मतं मिळवली. तसेच तटस्थ असलेल्या मनसे 1 आणि बहुजन विकास आघाडीनेही त्यांची 3 मतं भाजपला दिली. अशी एकूण 10 मतं भाजपला अतिरिक्तं मिळाली. या नंबर गेमने भाजपच्या तीनही उमेदवारांना जिंकून दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *