महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ जून । बंगळूरू : देशात कोरोना व्हायरसचं वाढतं प्रमाण पाहता कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, पुन्हा मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणं, मॉल्स, वेटर्स, दुकानदार आणि कारमध्ये मास्क घालणं बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला.
बंगळूरूमध्ये एका दिवसात 494 पॉझिटीव्ह
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये एका दिवसात 525 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, परंतु सर्वाधिक लोक बेंगळुरूमध्ये संक्रमित आढळलेत. 525 पैकी 494 प्रकरणं ही केवळ बंगळुरूमध्ये नोंदवली गेली आहेत. सकारात्मक बाब म्हणजे, या व्हायरसमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यातील 228 जणं कोरोनामुक्त झाले असून घरी परतले. राज्यात सध्याच्या स्थितीत 3177 पॉझिटिव्ह प्रकरणं आहेत, त्यापैकी बेंगळुरूमध्ये 3061 प्रकरणं आहेत.