देहूतील तुकाराम महाराजांचं मंदिर आज पासून बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ जून । देहूतील तुकाराम महाराजांचं मंदिर (12 जून) बंद ठेवण्यात येणारय. सकाळी 8 पासून देहूतील तुकाराम महाराज मंदिर भाविकांसाठी बंद असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण होणारंय, त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव देहूच्या तुकाराम मंदिरात पुढील तीन दिवस भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. (devotees will not be allowed to enter the tukaram temple in dehu for next 3 days for security reasons)

आषाढी वारी काळात ड्रोन कॅमेराने चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आलीये. पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे आषाढी वारी काळात ड्रोन कॅमेरा चित्रीकरण करता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने तसे आदेश दिलेत.. आषाढी एकादशीसाठी यंदा १२ ते १४ लाख भाविक येण्याची शक्यता आहे.. यादरम्यान ड्रोन कॅमेरा चित्रीकरण केल्यास त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफवा पसरून चेंगरा चेंगरी होण्याची भीती आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासनानं ड्रोनच्या वापरावर बंदी घातलीये.

आषाढी पूर्वी विठोबाचे दर्शन करण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी केली. आषाढी एकादशी दिवशी लाखो भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे आजच्या भागवत एकादशी पासून वारकरी विठोबांच्या दर्शनास येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *