मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच मंचावर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. (Prime Minister Narendra Modi on a Visit of Maharashtra) देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचं उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याने मोदी आणि ठाकरे एकत्र येणार आहेत.

श्रीसंत तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण
देहूतील श्रीसंत तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी दुपारी पावणे दोन वाजता देहूत दाखल होणार असून, मंदिराबाहेर 400 वारकऱ्यांकडून टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करणार आहेत. देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईतही मोदींचा आज दौरा आहे. मुंबईत जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

शिळा मंदिर आणि तुकोबाची मूर्ती
पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण होणारं शिळा मंदिर आणि तुकोबाची मूर्ती , संत तुकाराम महाराजांची मूर्ती केवळ 45 दिवसांतच साकारली गेली. शिल्पकार चेतन हिंगे यांनी ही मूर्ती साकारली आहे.

ती शिळा भाविकांना दर्शनासाठी
तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नव्हते.13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केलीय. म्हणून मंदिरास शिळा मंदिर असं संबोधलं जातं. मंदिरात महाराजांनी स्थापित केलेले दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता आत्ता संपूर्ण दगडामध्ये मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *