Cyber Attack on India : महाराष्ट्रातील 70 सह देशातील 500 वेबसाइटवर हल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । देशात मंगळवारी मोठा सायबर हल्ला झाला. देशातील 500 हून अधिक वेबसाइट हॅक झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांच्या साइटसह 70 वेबसाइटचा समावेश आहे. यापैकी तीन सरकारी आहेत. या प्रकरणात मलेशिया आणि इंडोनेशियातील हॅकर्सवर संशय व्यक्त केला जात आहे.

मधुकर पांडे, एडीजी, महाराष्ट्र सायबर सेल म्हणाले की, आम्ही अनेक वेबसाइट रिस्टोअर केल्या आहेत. अनेकांचे काम सुरू आहे. खासगी विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक केल्यानंतर राज्यातील 70 हून अधिक वेबसाइटवर हल्ला करण्यात आला. यापैकी तीन सरकारी होत्या. हॅक झालेल्या वेबसाइट्सची संख्या 500 पेक्षा जास्त आहे.

एडीजी पांडे म्हणाले की, देशात सुरू असलेल्या जातीय तणावादरम्यान अनेक सायबर हॅकर्सनी मिळून हा हल्ला केला. देशात अनेक वेबसाइट हॅक झाल्या आहेत. या प्रकरणात मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशांतील हॅकर्सची नावे समोर येत आहेत. ही टोळी भारतात सक्रिय आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

ठाणे पोलिसांचे सायबर सेलचे डीसीपी सुनील लोखंडे यांनी सांगितले की, आज पहाटे ४ वाजता पोलिसांची वेबसाइट हॅक करण्यात आली. तांत्रिक तज्ञांनी डेटा आणि वेबसाइट पुनर्संचयित केली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने राज्याच्या सायबर सेलला सरकारी वेबसाइट्स आणि इतरांच्या हॅकिंगची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याप्रकरणीही तपास सुरू करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *