महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ जून ।नॅशनल हेरॉल्डप्रकरणी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे नेते राहुल गांधींची चौकशी केली. यात त्यांना ४० पेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आले. राहुल सकाळी ११.०५ वाजता मुख्यालयात हजर झाले होते. तथापि, दोन दिवसांत राहुल यांची ईडी कार्यालयात २० तासांवर चौकशी करण्यात आली. बुधवारी त्यांना पुन्हा बोलावले आहे.
चौकशीला जाण्यापूर्वी राहुल काँग्रेस मुख्यालयी पक्षाच्या धरणे आंदोलनात सहभागी झाले. या वेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि बहीण प्रियंका गांधी-वढेरा उपस्थित होते. मुख्यालयाबाहेर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.