महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ जून ।पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर CNG हा परवडणारा पर्याय पुढे आला. पूर्वी कारपुरता मर्यादीत राहिलेला CNG आता रिक्षा, जीप, बस, टेम्पो आणि ट्रक यासारख्या वाहनांमध्येही वापरण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांकडे लोकांचा ओढा आहे. मात्र, बचतीच्या दृष्टीने सीएनजी जसा फायदेशीर आहे. तसे त्याचे काही तोटेही आहेत. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
काय आहेत सीएनजीचे फायदे?
इंधन खर्च कमी :
पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी गॅस स्वस्त आहे. तसेच सीएनजीवरील वाहनांचे मायलेजही जास्त असते. त्यामुळे इंधनावरील खर्च जवळपास निम्मा होतो. जो खर्च तुम्ही सीएनजी किटसाठी केला आहे, तो तुमच्या दिवसाच्या प्रवासानुसार दीड ते दोन वर्षांत वसूल होतो. त्यामुळे दररोज वाहन वापरणाऱ्यांना सीएनजी हा चांगला पर्याय आहे.
कमी प्रदूषण
पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. त्याऐवजी सीएनजीवर चालणारी वाहने वापरल्यास प्रदूषण कमी होते. सीएनजी कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ तयार करते, ज्यामुळे हानिकारक कार्बन मोनोऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होते.
मुबलक प्रमाणात उपलब्ध
भविष्यात पेट्रोल-डिझेलचा साठा संपण्याचा धोका आहे. मात्र, सीएनजी सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भारतातील नैसर्गिक वायूचा एकूण स्थानिक साठा सध्याच्या मागणीनुसार 27 वर्षांपर्यंत पुरवठा पूरेल एवढा साठा आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर CNG हा परवडणारा पर्याय पुढे आला. पूर्वी कारपुरता मर्यादीत राहिलेला CNG आता रिक्षा, जीप, बस, टेम्पो आणि ट्रक यासारख्या वाहनांमध्येही वापरण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांकडे लोकांचा ओढा आहे. मात्र, बचतीच्या दृष्टीने सीएनजी जसा फायदेशीर आहे. तसे त्याचे काही तोटेही आहेत. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
काय आहेत सीएनजीचे तोटे?
इंजिनची कार्यक्षमता कमी होते
पेट्रोलवरील वाहनांच्या तुलनेत सीएनजी कीट लावलेल्या वाहनांची कार्यक्षमता तेवढी दमदार नसते. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा सीएनजी वाहनांचा पिकअप कमी असतो. तसेच त्यांचा वेगही तुलनेने कमी असतो. 3-4 वर्षे जुने सीएनजी वाहन सुरू झाल्यावर कार्यक्षमतेते घट झाल्याचे दर्शवते. वर्षानुवर्ष इंजिनची कार्यक्षमताही 10 टक्क्यांनी कमी होत जाते.
जागेची कमतरता :
सीएनजी वाहनांमध्ये डिक्की किंवा बूटच्या जागेत सिलिंडर बसवलेले असतात. त्यासाठी वाहनांमधील जागा व्यापली जाते. त्यामुळे वाहनांमध्ये जागेची कमतरता जाणवते.
देखभाल खर्च जास्त :
पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कारच्या सर्व्हिस शेडय़ूलबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक असते. कारण सीएनजी इंजिनमध्ये पेट्रोल कारच्या तुलनेत इंजिनचे इंधन आणि स्पार्क प्लग लवकर खराब होतात.
सहज उपलब्ध होत नाही
देशातील अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये सीएनजीचा वापर केला जात आहे. मात्र, सीएनजीचे पंप कमी असल्याने अनेक राज्ये सीएनजीकडे वळण्यास तयार नाहीत. अनेक शहरांमध्ये सीएनजी मिळत नाही, त्यामुळे ग्राहकांना सिलिंडर भरता येत नाही.
पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर CNG हा परवडणारा पर्याय पुढे आला. पूर्वी कारपुरता मर्यादीत राहिलेला CNG आता रिक्षा, जीप, बस, टेम्पो आणि ट्रक यासारख्या वाहनांमध्येही वापरण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांकडे लोकांचा ओढा आहे. मात्र, बचतीच्या दृष्टीने सीएनजी जसा फायदेशीर आहे. तसे त्याचे काही तोटेही आहेत. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.