महागाई ; सिलिंडरनंतर आता नवीन गॅस कनेक्शनच्या किमतीतही वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ जून । पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी नवे सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी नागरिकांना 750 रुपये अधिक म्हणजेच 2200 रुपये द्यावे लागतील. (LPG Gas Cylinder Price Updates)

पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर 750 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला 1500 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला 4400 रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल 16 जूनपासून लागू होणार आहे.

त्याचप्रमाणे 150 रुपयांऐवजी 250 रुपये रेग्युलेटरसाठी खर्च करावे लागतील. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार, 5 किलोच्या सिलेंडरची सिक्युरिटी आता 800 ऐवजी 1150 करण्यात आली आहे.

ग्राहक एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेला, तर त्यासाठी त्याला 3690 रुपये मोजावे लागतील. शेगडी घ्यायची असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. एलपीजीच्या वाढत्या किमतींमध्ये कनेक्शनच्या किमतीमुळे लोक हैराण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *