दिलासादायक बातमी ! खाद्यतेल झालं स्वस्त; दरात घसरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । विविध खाद्यतेल कंपन्यांनी खाद्यतेलाच्या दरात मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी आणि पामतेल, सर्वांच्याच थेट विक्री किमतीमध्ये ही घट होणार आहे. ५ रुपये ते १५ रुपयांपर्यंत ही घट असणार आहे. यामुळे महागाईने त्रासलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळणार आहे. (Edible oil price reduced from 5 rupees to 15 rupees)

धारा या नावाने खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी कंपनीने मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या दरात जवळपास १५ रुपयांपर्यंत घट करण्यात आली आहे. थेट विक्री किमतीत ही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची (Edible oil price) मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे. पामतेलाच्या किमतीतही प्रतिलीटर साधारण ७ ते ८ रुपयांची घट झाली आहे. तर सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलीटर १० ते १५ रुपयांची घट झाली आहे. तर सोयाबीन तेलाची किंमत प्रतिलीटर ५ रुपयांनी स्वस्त झालं आहे.

फॉर्च्युन कंपनीच्या तेलातही लवकरच घट होणार आहे. तर जेमिनी तेलाच्या किमतीतही १५ रुपयांची घट झाली आहे. आणखी २० रुपये कमी होण्याची शक्यताही आहे. सूर्यफूल तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तेलाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसंच सरकारनं खाद्यतेलावरचं आयात शुल्कही कमी केलं आहे. त्यामुळे तेलाच्या दरात घट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *