5G service : भारतातील या शहरात लवकरच 5G सेवा सुरु होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभाग (DoT) या आठवड्यात लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, 26 जुलै 2022 रोजी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. यामध्ये 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 मेगाहर्ट्झ बँडचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आल्याचं समजतेय. या 5G सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. केंद्र सरकारने 5G सेवा 4G च्या तुलनेत 10 पट वेगवान असेल, असा दावा केलाय.

आता तुम्ही विचार करत असाल की देशात 5G सेवा कधी सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये 5G सेवा सुरु होऊ शकते, असे भारताच्या दूरसंचार विभागाने (DoT) याआधी सांगितले होते. काही महत्वाच्या शहरांमध्ये सर्वात आधी 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले होते. दरम्यान, भारतामध्ये सध्या अनेक ठिकाणी 4G सेवाही उपलब्ध नाही. पण देशात 5G ची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. पाहूयात देशात सर्वात आधी कोणत्या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.

या 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा सुरु होणार –
दूरसंचार विभागाच्या (DoT) माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरु(Ahmedabad, Bengaluru), चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे (Mumbai, Pune) या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, देशात सर्वात आधी कोणती टेलिकॉम कंपनी कमर्शिअल पद्धतीने 5G सेवा सुरु करेल, याबाबत अद्याप ठोसपणे सांगणे कठीण आहे. जिओ, एअरटेल अथवा व्होडाफोन-आयडिया यापैकी कोणतीही कंपनी असू शकते. याआधी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी भारतामध्ये कमर्शिअल पद्धतीने 5G सेवा होऊ शकते असे वृत्त आले होते. पण नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, स्पटेंबर 2022 पर्यंत 5G ची वाट पाहावी लागणार आहे.

ट्रायची 20 वर्षांच्या वैधतेवर सहमती
दूरसंचार विभाग लिलावासाठी स्पेक्ट्रमच्या 20 वर्षांच्या वैधतेच्या बाजूने आहे, कारण ट्रायने 20 वर्षांच्या आधारावर राखीव किंमतीची गणना केली होती. या वर्षी एप्रिलमध्ये 5G-संबंधित शिफारशींमध्ये, संबंधित बँडच्या संदर्भात 30 वर्षांसाठी स्पेक्ट्रम वाटपाची राखीव किंमत स्पेक्ट्रम वाटपाच्या राखीव किंमतीच्या 1.5 पट आहे जी 20 वर्षे असावी असं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) म्हटले होते.

5G स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित
भारत सरकार या वर्षी ऑगस्टपर्यंत स्वदेशी विकसित 5G तंत्रज्ञान लॉन्च करू शकते असे संकेत दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिले होते. UN ची संस्था ITU ने जिनिव्हा येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) 2022 मध्ये बोलताना त्यांनी ही टिप्पणी केली. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकार संशोधन आणि विकास निधी सुरू करत आहे. महत्त्वाचे म्हणजे, IT प्रमुख TCS आणि सरकारी मालकीची दूरसंचार संशोधन संस्था CDoT स्वदेशी 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेली आहेत अशी माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *