TMKOC : अखेर ‘दयाबेन’ मिळाली ! ‘ही’ अभिनेत्री होणार दयाबेन जेठालाल गडा

 147 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ जून । लोकप्रिय फॅमिली कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) यामधील लोकप्रिय पात्र असलेली दयाबेन (दिशा वकानी) ही गेल्या चार वर्षे शोमध्ये दिसली नव्हती. काही कारणात्सव दिशा वकाणी यांनी शो सोडला होता. तेव्हापासून प्रेक्षक ‘दयाबेन’ला शोमध्ये मिस करत होते. पण, अखेर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. कारण शो च्या निर्मात्यांनी नवीन ‘दयाबेन’ मिळाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राखी विजन-टंडन (Rakhi Vijan) या आता शोमध्ये ‘दयाबेन’चं पात्र निभावणार आहे. यामुळे प्रेक्षकांना नवी दयाबेन आणि जेठालाल याला नव्या स्वरुपातली दया मिळणार आहे. (Who is new Dayaben? Rakhi Vijan to replace Disha Vakani on ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’?)

https://www.instagram.com/rakhivijan/?utm_source=ig_embed&ig_rid=7c3ed733-7111-4aa1-a773-53137a3aa7d2

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) या टीव्ही सिटकॉमची गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक दयाबेन चार वर्षांनंतर या शोमध्ये दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री राखी विजन आता दयाबेनची जागा घेणार आहे. राखी विजन-टंडन या ९० च्या दशकातील शो ‘हम पांच’मधील तिचे लोकप्रिय पात्र स्वीटी माथूरसाठी प्रसिद्ध आहे, तिला आता दयाबेनच्या भूमिकेत सामील करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *