![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । राज्यभरात पावसाने (monsoon rain) हजेरी लावली आहे. कोकणासह अनेक भागात पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पण, जळगावमध्ये (jalgaon) अजूनही पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. पावसाळ्यातही उन्हाचा पारा 40 अंशावर आहे.जळगावात उत्तरेकडे मान्सूनची आगेकूच होत असताना जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसासोबत ढगांचीही माया आटल्याने जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमान वाढत आहे. शनिवार जिल्ह्यात 40 टक्के एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
दिवसा उन्हाचा चटका अधिक प्रखरतेने जाणवत होता. हवामान विभागाने १३ जून रोजी खान्देशात मान्सून दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, कोरड्या मान्सूनने जळगाववासीयाची साफ निराशा केली. केवळ मान्सूनच्या चर्चेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची केलेली पेरणी आता वाया जाण्याची शक्यता आहे.
पावसाचा हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार, आता सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र जर आता येत्या दोन दिवसांत पाऊस नाही आला तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.
दरम्यान, अखेर गोंदिया जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली असून पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या 20 दिवसापासून शेतकऱ्यांसह नागरिक पावसाची चातका प्रमाणे वाट पाहत असताना आज पहाटेपासून पाऊस धो धो बरसल्याने सर्वच सुखावल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. मागील दोन तासांपासून पाऊस सुरू असून खरीपाच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.