VidhanParishad Election | सर्व आमदारांचं मतदान पूर्ण; आता निकालाकडे लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० जून । Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी 285 आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. 5 वाजेपर्यंत वेळात मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. इतर सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. तर काँग्रेसही एक आमदार सहज जिंकून आणू शकतो.

मात्र काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार विधानपरिषदेत निवडून आणण्यासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. आता काँग्रेस ही 10 अतिरिक्त मत जमवण्यात यशस्वी ठरते का हे सायंकाळी निकालानंतर स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *