महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांवरील डॉक्टर दिवस-रात्र एक करीत आहेत. मात्र एकीकडे डॉक्टर, नर्सेस यांच्यासह सर्वच आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढत असताना नागरिक मात्र रस्त्यावर उतरत असल्याने कोरोनाचा आकडा वाढतच आहे. याला नियंत्रणात आणायचं असेल तर पुढील पंधरा दिवस अतिमहत्त्वाचे असून शहरात 100 टक्के लॉकडाऊन पाळणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली आहे.