राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ जून । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरगाव येथील या हॉस्पिटलमध्ये काही वेळापूर्वी त्यांना आणण्यात आलं आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळालेली नाही, अशी माहिती मिळत आहे.

विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी तब्येत कालपासून खराब झाली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांना ताप होता. त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली असता आता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तात्काळ त्यांना रिलायन्स हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांचीही साथ एकनाथ शिंदे यांना लाभली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी या बंडखोर गटाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे हे नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपला समर्थन देत असल्याचं पत्र देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयात दाखल केल्यामुळं आता ही प्रक्रिया अजून दोन ते तीन दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *