‘महाराष्ट्र अडचणीत आणलात शिंदेजी, आता आसामसुद्धा अडचणीत आणू नका, निघा आता ‘ आसाम पूर परिस्थितीवरून काँग्रेसने शिंदेंना फटकारलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । शिवसेनेचे (shvisena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आधीच आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार अडचणीत आणलं आहे, पण आमचे राज्य नका अडचणीत आणू नका, निघा आता, असा सणसणीत टोला आसामच्या (asam) काँग्रेसने लगावला आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३३ आमदार फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले आहे. मागील पाच दिवसांपासून हे बंडखोरांचे नाट्य सुरू आहे. गुवाहाटीमधील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे आमदार तळ ठोकून आहे. खुद्द आसामधील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे पूर्ण मदत करत असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खडेबोल सुनावले आहे.

महाराष्ट्र अडचणीत आणलाच शिंदेजी,आता आसामसुद्धा अडचणीत आणू नका. पूरपीडित लोकांना मदत देण्यापेक्षा आपल्या सरबराई मध्ये आमचं सरकार व्यस्त आहे,हे महाराष्ट्राला शोभत नाही. तुम्ही तुमची घालवली तेवढी इज्जत पुरे आहे. निघा आता’अशी टीका

 

एकनाथ शिंदे हे आधी गुजरातमधील सुरतमध्ये मुक्कामी होते. पण, महाराष्ट्रापासून अंतर जवळ असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते. यावेळी भाजपचे नेते सुद्धा सोबत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या बंडाला रसद आणि सुरक्षा पुरवत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *