Pandharpur wari 2022: पाऊले चालती पंढरीची वाट ; माऊलींची पालखी जेजुरी मार्गे पंढरपूरकडे रवाना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर वारकऱ्यांसाठी दिवे घाट (Dive Ghat) सर केला. माऊलीची पालखी जेजुरी मार्गे पंढरपूकडे (Pandharpur wari 2022) मार्गस्थ होत आहे. पुणे ते सासवड दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून काल सासवड येथे पालखीने मुक्काम केला. तर तुकोबांच्या पालखीने (Tukoba Palkhi) लोणीकाळभोरसाठी प्रस्थान ठेवले.

पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर वारकऱ्यांसाठी दिवे घाट (Dive Ghat) सर केला. माऊलीची पालखी जेजुरी मार्गे पंढरपूकडे (Pandharpur wari 2022) मार्गस्थ होत आहे. पुणे ते सासवड दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून काल सासवड येथे पालखीने मुक्काम केला. तर तुकोबांच्या पालखीने (Tukoba Palkhi) लोणीकाळभोरसाठी प्रस्थान ठेवले.

पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखीने प्रस्थान ठेवले त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली. साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती. काल योगिनी एकादशी होती, त्यामुळे याच हडपसर मार्गावरती पुणेकरांनी वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *