महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – , नवी दिल्ली : देशात करोना विषाणूग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ आणि लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याच्या निर्णयामुळे हताश झालेल्या गुंतवणूकदारांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणुकीवर भर दिला आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा जूनसाठी भावी वायदे भाव (जून फ्यूचर) बुधवारी दोन वाजण्याच्या सुमारास ०.१९ टक्क्यांच्या तेजीने प्रति दहा ग्रॅमसाठी ४६,३७६ रुपयांवर पोहोचले. याच दरम्यान चांदीचे मे महिन्यासाठी भावी वायदे भाव १.१२ टक्क्यांनी उसळून प्रति किलोसाठी ४३,८०७ रुपयांवर पोहोचले. दिवसभरातील व्यवहारांत चांदीने प्रति किलोसाठी ४४,५८४ रुपयांची उच्चतम पातळी गाठली.