सातारा जिल्हा माण तालुक्यातील कळसकरवाडीत रेशनिंग दुकानाच्या काळाबाजाराचा अखेर भंडाफोड!

Spread the love

Loading

स्टींग ओप्रेशनद्वारे तरुणांनी आणला गैरप्रकार उघडकीस

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – सातारा । प्रतिनिधी ।महामारीच्या संकटातून जीवन मरणाची धडपड करणाऱ्या सामान्य नागरिकांना शासन विविध मार्गाने मदत करत आहे. त्यात रेशनिंगवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र माण  तालुक्यातील कळसकरवाडी गावातील रेशनिंग दुकानात महिनोंमहिने सुरु असलेला काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. चक्क माणुसकीला काळीमा फासणारा व्यवहार, लुटालूटीचे प्रकार गावातीलच काही युवकांनी केलेल्या स्टींग ओपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.तर माण तहसिलदारांनी या दुकांदारावर कारवाई करुन त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

दुष्काळाने आधीच वाताहत झालेल्या माण तालुक्यातील कळसकरवाडी या दुर्गम गावात लाँकडाऊनमुळे अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात रेशनिंग दुकानात धान्य अनेक कुटुंबाचा आधार असून दुकानदार मात्र त्यांना  पावती देत नाही, हिशोबापेक्षा अधिक पैसे घेऊन लुटालूट करतो. ही बाब सर्वांच्या लक्षात आली मात्र तरीही त्याच्यावर कारवाईसाठी प्रयत्न केले जात नव्हते.
लाँकडाऊनमुळे नागरिकांना बाहेर जाता येत नसल्याने रेशनिंग दुकानातील धान्य चढ्या दराने पावती न देता दिले जात असल्याबद्दल युवक आणि जेष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला. मोबाईलमध्ये सदर दुकानाच्या गैर प्रकाराचा विडिओ शुटिंग करुन लुटालुटीचे पितळ उघडे पाडले. मात्र सदर दुकानदार हा बनेल असल्याने गावातील नागरिकांनी सह्या घेऊन माण तहसिलदारांना संबंधित दुकानदारावर कारवाई करून परवाना रद्द करण्याचे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
लाँकडाऊनमध्ये माणुसकीला न शोभणारे रेशनिंग दुकानदाराचा व्यवहार आणि सर्रास लुटालूट संतापजनक असल्याचे मत कळसकरवाडीतील नागरिकांना व्यक्त केले आहे
*प्रतिक्रिया*
सध्या जगावर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना स्वस्त भाव दुकानदारांनी अशा प्रकारच्या संकटाचे संधीत रूपांतर करणे हा प्रकार निश्चितच घृणास्पद, किळसवाणा आहे. या संतापजनक बाबीचा आम्ही सातारकर तीव्र निषेध व्यक्त करतो. अशा भामट्यांवर शासनाने कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
– मदन साबळे 
अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळ, वडूथ सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *