देशात कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – , मुंबई : देशभरातील विविध राज्यांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून देशभरातील कोरोना संक्रमितांची संख्या 12 हजार 380 वर गेली आहे. बुधवारी महाराष्ट्रात 117 नवे रुग्ण समोर आले. पैकी 66 जण मुंबईचे, तर 44 जण पुण्याचे आहेत. गुजरातेत बुधवारी 56 नवे रुग्ण आढळले.. दुसरीकडे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 117, राजस्थानात 41 आणि पश्चिम बंगालमध्ये 23 नवे संक्रमित आढळले आहेत. देशात आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशात संक्रमितांचा आकडा 858 वर गेला आहे. गुजरातेत 699 संक्रमित आहेत. राजस्थानातील संक्रमितांची संख्या 1046 वर गेली आहे. उत्तर प्रदेशात 806 संक्रमित आहेेत. बुधवारी राज्यात नवे 45 रुग्ण आढळले आहेत.

बिहारमध्ये संक्रमितांचा आकडा 70 आहे. आंध्र प्रदेशात 502 जण संक्रमित आहेत. बुधवारी नवे 19 रुग्ण आढळले आहेत. राज्यात आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात 277 संक्रमित आहेत. बुधवारी नवे 17 संक्रमित आढळले. मृतांचा आकडा 11 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *