एकही कोरोना रुग्ण या देशांमध्ये आतापर्यंत आढळला नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – , मुंबई :चीनच्या वुहान शहरामधून सुरू झालेला कोरोना व्हायरस आता जगभरात प्रसरला आहे. या महामारीमुळे जगभरातील देश लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस नाव उच्चारले तरी नागरिक घाबरतात. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक देशांमध्ये या व्हायरसने थैमान घातले असून, 20 लाखांपेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. मात्र जगातील असे काही देश आहेत जेथे आतापर्यंत कोरोना व्हायरस पोहचलेला नाही.

जगातील 7 खंडांपैकी 6 खंडांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. केवळ अंटार्कटिका एकमेव खंड या व्हायरसपासून आतापर्यंत वाचलेला आहे. मात्र याशिवाय काही देश असे आहेत, जेथे अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही.

या देशात नाही एकही कोरोना रुग्ण –

कोमोरोस
किरिबाती
लेसोथो
मार्शल आयलँड्स
मायक्रोनेशिया
नॉरू
उत्तर कोरिया
पलाऊ
समोआ
सोलोमन आयलँड
ताजिकिस्तान
टोंगा
तुर्केमेनिस्तान
तुवालू
वानुअतू
या देशांमध्ये कोरोना न पोहचण्याचे मुख्य कारण तेथील कमी लोकसंख्या आहे. या 15 देशांमध्ये अधिकांश लहान बेट आहेत. हे बेट प्रसिद्ध नसल्याने पर्यटकांची गर्दी नसते, त्यामुळे आपोआप सोशल डिस्टेंसिंगचे पालन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *