महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,४५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,४५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,९९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,८१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,८१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा)