आमदारांचा पगार चांगला आहे ; आम्ही पैसे भरून येथे राहतोय ; आमदार दीपक केसरकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिंदे गटाचे सर्व बंडखोर आमदार हे काही दिवस गुजरात मधील सुरत येथे तर त्यानंतर आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. यादरम्यान सुरतेहून गुवाहाटीचा हा प्रवास बंडखोर आमदारांनी चॅर्टेड विमानाने केला होता, त्यामुळे हे आमदार राहत आहेत त्या फाइव्ह स्टार हॉटेल तसेच विमान प्रवासाचा खर्च कोण करतंय? असा प्रश्न समोर येत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून घेण्यात आलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. (Rebel MLA Deepak Kesarkar commented on expenses of rebel shivsena mla)

तुम्ही सुरतमध्ये आणि त्यानंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये राहता आहात तसेच खाजगी विमानाने प्रवास करत आहात याचा नेमका खर्च कोण करतंय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, असेच प्रश्न वेगवेगळ्या राज्यात विचारला जातो, दुसऱ्या पक्षाचे आमदार जेव्हा हॉटेलात जातात तेव्हा साध्या हॉटेलात राहातात का? आमच्या आमदारांचा पगार चांगला आहे, आम्ही काहीच फुकट घेत नाहीत, पैसे देत आहोत आणि ऑफिशीअली देत आहोत. त्यांच्याकडून काय असेल ती सवलत घेतो. पण पैसे भरूनच आम्ही येथे राहतोय, फुकटात तर राहत नाहीत. कोणताही पक्ष आमचा खर्च करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *