भाजपकडून शिंदे गटाला हि मोठी ऑफर ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । शिवसेनेत (Shivsena) बंड केलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने (BJP) शिंदे गटाला मोठी ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे गट भाजपसोबत गेल्यास उपमुख्यमंत्रीपदासह 17 मंत्रिपदं आणि 6 महामंडळं मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे.

गेल्या अडीच वर्षात केवळ घटकपक्षांचाच फायदा झाला मात्र यात शिवसैनिक भरडले गेले. शिवसेनेचं पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आलं. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे, अशी भूमीका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *