आणखी एक मंत्री ; उदय सामंत शिंदे गटात सामील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीसाठी रवाना झाले होते. चार्टड विमानाच्या लिस्टमध्ये सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. तसेच त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. शिंदे गटात सहभागी होणारे सामंत हे आठवे मंत्री आहेत. (Possibility of joining Uday Samant Shind group)

कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते उदय सामंत (Uday Samant) यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल असतानाच रविवारी (ता. २६) त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. त्यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांच्या काही समर्थकांमध्ये उदय सामंत गुवाहटीला पोहोचल्याची चर्चा सुरू होती. आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याची माहिती आहे.

पत्रकारांशी बोलतानाही सामंत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे मत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे उदय सामंत नक्की कुठे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अशात शनिवारी (ता. २५) मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते. त्यामुळे सामंत जाणार की नाही याबाबत संभ्रम होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *