महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । सुदीपकुमार देवकर। दि.२६ जून । कळंब। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी स्मारक समितीचे विश्वस्त तथा माजी नगरसेवक सुनिल गायकवाड,शिवाजी सिरसट,प्रमोद ताटे,बाळासाहेब कथले,चिंतामणी हौसलमल,भाऊसाहेब कुचेकर,रमेश भोसले,सुधीर गायकवाड,शिंदे मामा,अविनाश घोडके,सुरज गायकवाड,सागर पट्टेकर,शुभम गायकवाड,सत्यजित तुपारे,रोहन कसबे,प्रविण गायकवाड आदींची उपस्थिती होती.