महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । आम्ही दोन ते तीन दिवसच विरोधी पक्षात असून, लवकरच आम्ही सरकार आणू, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले. कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासनाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी दानवे बोलत होते.
यावेळी दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमची युती होती. त्याचवेळी आम्ही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील, असे सांगितले होते. निवडणूक झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत गेली. आता शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याने ४० आमदारांनी बंड केले आहे. यात भाजपचा संबंध नाही. आम्ही वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. आम्हाला शिंदे गटाचा प्रस्ताव अद्याप आला नाही. आल्यास आम्ही सरकार स्थापन करू.