महाराष्ट्र 24 । सातारा । विशेष प्रतिनिधी |लॉकडाऊनमध्ये सामाजिक अंतर ठेवून रेशन दुकानदारांनी काळाबाजार रोखण्यासाठी वडूथ येथील सरकारमान्य स्वस्त धान्याचे प्रत्येक ग्रामस्थांच्या घरोघरी शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना शिधापत्रिकेनुसार अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. वडूथ विकास सेवा सोसायटीतर्फे सरकार मान्य रास्तभाव दुकानासमोर गर्दी होऊ न देता सामाजिक अंतर ठेवून लोकांना घरोघरी शिस्तबद्ध पद्धतीने धान्य वाटप केले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.आपत्तकालीन परिस्थितीत रेशन वाटपाचा हा वडूथ पॅटर्नाचे अन्य गावांसाठी अनुकरणीय ठरत आहे.
वडूथ ता.सातारा येथील सोसायटीचे चेअरमन सदस्य सरपंच,पोलीस पाटील,तलाठी, कोतवाल आणि ग्राम स्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य धान्य वाटपा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.सामान्य नागरिकांच्या घरात जीवनावश्यक वस्तू, धान्य वेळेतच स्वस्त धान्य दुकानादारां मार्फत पोचवले जात असून कोणी वंचित वंचित राहणार नाहीत, याची विशेष दक्षता घेतली जात आह.यामुळे कोणत्याही प्रकारचा काळाबाजाराला थारा नाही.धान्य वाटपावर गाव पातळीवरील ग्रामदक्षता समितीचे सदस्य हे नजर ठेऊन आहेत.अन्य गावात ही वडूथ पॅटर्नप्रमाणे दक्षता घेतली तर सर्वांना धान्य आणि काळाबाजार होण्यास आळा बसणार आहे.