पुणे पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी रस्त्यारस्त्यावर योगा क्लास सुरू केले

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे :लॉकडाऊन सुरू असताना गुरुवारी सकाळी पुणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यारस्त्यावर योगा क्लास सुरू असल्याचे आढळून आले. नाही हे काही नेहमीचे योगा क्लास नव्हते तर विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या आणि सकाळी फिरायला येणार्‍या पकडून पोलिसांनी त्यांना योगा करायला लावले होते.

शहरात दररोज कोराना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अर्ध्या शहरात कर्फ्यू लागू करुन परिसर सील करण्यात आला आहे. असे असतानाही असंख्य पुणेकरांना त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे या सर्वांना कायदेशीर कारवाई करण्याइतके पोलीस बळ अडकवून ठेवणेही पोलिसांना शक्य होत नाही. त्यावर पोलिसांनी एक नामी शक्कल लढविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *