“संजय राऊत हे शरद पवारांच्या आदेशानुसार…” बंडखोर आमदारांनी केला गंभीर आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्ष संपव असल्याचा आरोप केलाय. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध बंडखोर आमदार अशी न्यायलायीन लढाई सुरु असतानाच बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणाऱ्या राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमदांरांच्यावतीने बोलताना संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. “संजय राऊत हे शरद पवारांच्या आदेशानुसार पक्ष (शिवसेना) संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या चालवतील,” असं केसकर यांनी म्हटलं आहे.

मात्र पुढे बोलताना केसकर यांनी बंडखोर आमदार संघर्ष सुरु ठेवणार असल्याचंही नमूद केलंय. “आम्ही संपणार नाही. आम्ही थांबणार नाही. आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेवून ठेवत नाही,” असं केसकर यांनी म्हटल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *